औरंगाबाद: लहानपणापासून आईने कितीही संकटे आली तरी मुलांना लहानचे मोठे केलेले असते. तळहाताच्या फोडासारखे जपलेले असते, परंतु मोठे केलेले असते. तळहाताच्या फोडासारखे जपलेले असते, परंतु मोठे झाल्यावर त्याच आईला काही काही जण घराबाहेर हाकलून बेघर करतात. काही जण आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवतात. वृद्धाश्रमात आसरा न मिळालेल्या काही माता कुठेही रस्त्यावर, घाटी हॉस्पिटलबाहेर आपल्या मुलांची वाट पाहत हालअपेष्टेत जीवन जगताना दिसतात काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मदर्स डे निमित्त दैनिक सांजवार्ताने रस्त्यावर, घाटी हॉस्पीटलबाहेर जीवन जगत असलेल्या आपल्या मुलांची वाटप पाहणार्या काही ङ्गआईफ शी संवाद साधला. यावेळी मन सुन्न करणार्या कथा समोर आल्या. काही जणांना मुली आहेत, परंतु त्यांचे लग्न झाल्याने त्या संसारात रमल्या. त्यामुळे ङ्गआईफ मिळेल तिथे आसरा घेत असल्याची कथा समोर आली. तर काही जणांना मुलगा असताना तो आज आईकडे लक्ष देत नाही. इतकेच नव्हे तर काही आईंना तीन मुल असताना आईला सांभाळायचे कोणी? असा प्रश्न पडला. त्यामुळे आईनी घाटीबाहेरच राहायला सुरुवात केली. चार वर्ष उलटून गेली आजही या रस्त्यावर, घाटीबाहेर जीवन जगणार्या आईला आपल्या मुलांंची आठवण येते. त्यांना आजही आपले मुले भेटायला तरी येतील, अशी आशा वाटते.
अन्नदान करणारेच माझे मुले, मुली
रेल्वेमध्ये नोकरी करत होते. इगतपुरी येथेही काही दिवस काम केले. मला दोन मुली आहे. त्यांचे लग्न झाले. मुलीमुळेच मी औरंगाबादला आले होते. परंतु मुलींचे लग्न झाल्याने मी कुठे राहणार घाटीच्या बाहेरच. मी सहा वर्षांपासून राहते, सामाजिक संघटना अन्नदान करता, हेच माझे घर आणि हेच माझे मुले, मुली असे मी समजते.
- ताराबाई पवार
चार वर्षांपासून मुलाची वाट पाहतेय
एक मुलगा आहे, सून आहे परंतु ते त्यांच्या संसारात रमले आहेत. चार वर्षांपासून मी समाजातील लोक जेवायला देतील ते खाते. एका मंदिरात काम करून महिनाकाठी पाचशे रुपये मिळतात. त्यावर कसे तरी भागविते. कधी तरी मुलगा भेटायला येईल.
- कमलाबाई गायकवाड
घाटीसमोरच मिळेल ते खाते
दोन वर्षांपूर्वी रक्त कमी झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल झाले होते. एक तर मला चालता येत नाही त्यामुळे कोण
काम देणार? त्यामुळे लोकांनी दिलेले जेवण करते. मिळेल त्या जागेवर झोपते. औषधे घेण्यासाठी कुणाकडूनही पैसे मागावे लागते. एक मुलगा दोन मुली आहेत. पण त्या त्यांच्या कामात आहेत. येतील कधी तरी वेळ मिळेल तेंव्हा भेटायला.
- सुमन सोनटक्के
बेघर आईंना सामाजिक
संघटनांनी मदत करावी
वृद्धाश्रमातील आईंना रहायला घर, वेळेवर जेवण तरी संस्थाकडून मिळते. परंतु रस्त्यावरील, घाटी रुग्णालसमोर राहणार्या बेघर आईचे का? त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? माणूसकी ग्रुपच्या वतीने या आईंना मदत केली जाते. काही सामाजिक संघटनाही अन्न, वस्त्र या गरजा पूर्ण करतात. परंतु निवार्याचे काय? उन्ह, पाऊस असला तर या आई कुठे जाणार? यांच्याकडे मुलांनी लक्ष दिले तर खर्या अर्थाने ङ्मदर्स डेफ साजरा होईल.
- सुमित पंडित (अध्यक्ष, माणुसकी ग्रुप)